गांधी बाबा बरे झाले तुम्ही नाही

Started by sanket korde, August 01, 2016, 05:48:42 PM

Previous topic - Next topic

sanket korde

गांधी बाबा
चांगले कोणी बोलतच नाही हो आता
बरे झाले शब्द ऐकायला तुम्ही नाही
शब्द तुमच्या कानात शिरताच हातातली काठी त्यांच्या तोंडावर तुम्ही मारली असती
अहो गोरे इंग्रज परके होते
पंरतू हे काळे तर आपले आहे ना
आपल काही राहिल नाही इथे
रोज रचल्या जाते इथे कट आपल्याच माणसाविरूद्ध
आणि रचनारेही असतात आपलेच
म्हणून म्हणतो गांधी बाबा बरे झाले तुम्ही नाही
तुमच्या डोळ्यांना सहनच नसत झाल ते
इंग्रजाविरूद्ध लढला तुम्ही काठीने
या काळ्याविरूद्ध कसे लढला असता
एकाने तुमची काठी आणि एकाने तुमचा चष्मा चोरला असता
चालताना तुम्ही कुठेतरी खड्ड्यात पडला असता
आणि खड्डे फार वाढले बर आता इथे
तुम्हाला पाहिले ही नसते कोणी लवकर
सगळ्याच घटनांचा आढावा भेटला असता तुम्हाला रात्री बातम्या पाहताना ते सार पाहून तुमच्या हृदयातून एकच आवाज निघाला असता
हे राम काय चालल हे माझ्या देशात
म्हणून म्हणतो गांधी बाबा बरे झाले तुम्ही नाही 

संकेत