तुला गमावल्याचं दुःख

Started by kalpesh.patil, August 01, 2016, 09:57:02 PM

Previous topic - Next topic

kalpesh.patil

👫तुला गमावल्याचं दुःख👫

आजवर अनेक दुःख पहिले मी
अनेक दुःखांना सामोरे देखील गेलो मी
मात्र तोच चेहरा पुन्हा समोर पाहता
असह्य वेदना देणारं दुःख प्रथमच पाहिलंय मी

कैक दुःख सोसून
कठोर झालेलं माझं ह्रुदय
आज तुला पाहता
जणू मऊ मेनाहून हलके झाले
हीऱ्याच्या तुलनेत काचेच्या तुकड्यागत
बाजूला ठेवणारा तुला मी
मात्र तीक्ष्ण काचेची जखम
खोलवर ह्रुदयाचा ठाव घेऊन गेली

खरंच आज खुप गमावल्यागत वाटतंय
हिशेबात एक पैसा जरी गमावला
तर हिशेब चुकतो
मात्र इथे तर सर्वस्व गमावलंय
मग या हिशेबाचं काय

सहज विसरून जाईन
या चुकीच्या समजुतीने
चेहऱ्यावर हास्य ठेऊन
जीवन जगणारा मी
मात्र तुला पाहताच हतबल होऊन
डोळ्यांत ओंघळणारे अश्रु टिपण्यासाठी
प्रथमच एकांत शोधलाय मी

  कल्पेश पाटील
       पनवेल
9594764745