तुझी भेट - ४

Started by गणेश म. तायडे, August 02, 2016, 11:43:37 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

पहिली भेट तुझी न माझी, ओळख नाही एक दूसऱ्याची...
प्रेम केले मनोमनी, रंग उधळत जिवनी
पाहिले तुज स्वप़्नी, मागितले तुज क्षणोक्षणी
पहिली भेट तुझी न माझी, ओळख नाही एक दूसऱ्याची...
क्षण तो आला भेटायचा, पाहिलेली स्वप़्न जगायचा
मनी प्रश्न पडायचा, सजना कसा ओळखायचा?
विश्वास होता मनाचा, वेळ न लागेल क्षणाचा
वाटेत अडकल्या नजरा, पाहण्या तुझा चेहरा
वेळ जवळ येता येता, वाढला हृदयाचा ठोका
मनात कोरलेली प्रतिमा, गर्दीमध्ये शोधू लागली
क्षणात ओळखले तुजला, नजरेनजर एक झाली
नजर स्थिर झाली तुजवर, पाहता परी स्वप़्नातली
थरथरी सुटली अंगात, शहारे भर उन्हात उठती
घेऊन हात हातात तत्पर, स्पर्श जणू स्वप़्नास केला
बसून जरा एकांतात, मनभरूण पाहिले तुजला
चोरून चोरून पाहू लागलो, ऐकमेकास तव निरखूण
मनात खूपकाही बोलायचे, पण ओठी हसू न थांबायाचे
हळूहळू मन झाले निवांत, शब्द जेव्हा उलगडू लागले
बांधल्या गेल्या रेशीमगाठी, मनोमनी मिलन घडले
स्पर्श कसा हा हवा-हवासा, शब्द कसे हे नवे-नवे
आठवणीच्या अवघड गाठी, सुटू लागल्या अलगदपणे
खुपकाही होते बोलायचे, पण वेळ ही परतीची आली
पाऊले जड होऊ लागली, उरात विरह दाटू लागला
दूर पाऊले जाता जाता, नजरे आड होता होता
प्रश्न मनी पडायचा, भेटशील पुन्हा मज कधी
पहिली भेट तुझी न् माझी, ओळख झाली एक दूसऱ्याची...

- गणेश म. तायडे,
   खामगांव
    ganesh.tayade1111@gmail.com