राखी

Started by sanket korde, August 02, 2016, 12:51:19 PM

Previous topic - Next topic

sanket korde

नाही माडी
नाही गाड़ी
नाही खिशात दमडी
तरीही मी आता नाही दुखी
ताई तू बांधली हातात माझ्या राखी

किती प्रेमाने लावला ताई तू कपाळा वरती टिळा
तुझ्या डोळयातल प्रेम पाहतो  भाऊ तुझा भोळा
तुझ्या त्या साखरेच्या घासाचा  ताई मी भुखी
ताई तू बांधली हातात माझ्या राखी

ओवाळूनी माझ्या वरती तो दिव्याचा प्रकाश
दिला आशिर्वाद तू किती पुरणार नाही आकाश
ताई बघून घे हा  आनंद तुझ्या भावाच्या मुखी
ताई तू बांधली हातात माझ्या राखी

ताई तुझी राखी देते ग बळ
वेडे हस थोड़ी बदलेल ही वेळ
माझ्या दुःखात ही साथ तुझी ठेवते मला सुखी
ताई तू बांधली हातात माझ्या राखी

पाहू नको आता जास्त दिवस तू वाट
आज प्रेमानेच भरतो मी तुझ हे ताट
एक दिवस देणार सार उरलेल हे बाकी
ताई तू बांधली हातात माझ्या राखी


संकेत