गटारी

Started by sanket korde, August 02, 2016, 04:50:00 PM

Previous topic - Next topic

sanket korde

ओतायाची पेल्यात दारू
पिण करायच सुरू
पोटात उतरावयाची सारी
अशी असते का गटारी

पोट भरून नाही खायच
पोट भरून पेयायच
झुलत झायच घरी
अशी असते का गटारी

दारू देते का हो सुख
पोटाला याच्या त्याचीच भुख
डोक्याची होते याच्या भिंगरी
अशी असते का गटारी

चालता चालता पडत
पडून उठत पुन्हा पडत
काढत तिथेच रात सारी
अशी असते का गटारी

झोपले असतात शेजारी
ही वाट पाहते दारी
तो पडला कसा येईल घरी
रोजच असते येथे ही गटारी



संकेत