शिकत आहे.......???

Started by Ashok_rokade24, August 02, 2016, 09:49:55 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

अवती भवती विश्व हे सुंदर,
तरीही जीव गुदमरत आहे ,
जो उठतो तो ज्ञान शिकवितो,
शिका,अजूनी तुम्हा शिकायचे आहे ,

आजोबा सांगती धरून हाता,
पाऊल ऊचला हळुवार चला ,
करण्या पार अंतर दुरवरचे ,
चालणे तुज शिकायचे आहे

बाबा म्हणे अती प्रश्न गहण,
जीवनभर साथ न सोडणारा ,
सन्मान मलाही हवाच आहे,
म्हणून तुला शिकायचे आहे ,

आई म्हणे ऐक रे बाळा ,
यातना पाहू कशा या डोळा,
सुखी जीवन तुझे पहायचे आहे,
म्हणून तुला खुप शिकायचे आहे ,

म्हणती गुरूजन शिक रे बाळा,
माणूस म्हणून तुज जगणे आहे ,
आयुष्य सुंदर सुगंधी करण्या ,
आता तुला शिकायचे आहे ,

म्हणती मुले कसे तुम्ही वागता ,
काय बोलता कसे चालता ,
लाज आम्हाला नित वाटत आहे ,
म्हणून तुम्हा अजून शिकायचे आहे,

आणिक पत्नीची वेगळी कहाणी ,
विरोध नित असे साथ सोडूनी ,
अवमान पदोपदी करीत आहे ,
कैसे रहावे आता शिकायचे आहे ,

अवती भवती  सारेच ज्ञानी ,
पुढे निघाले मागे मज सोडूनी ,
एकटाच राहिलो मन उदास आहे,
कसे रहावे आता मी शिकत आहे ........
                      अशोक मु . रोकडे  .
                          मुंबई  .