ओझे खांद्यावरचे.......??

Started by Ashok_rokade24, August 02, 2016, 10:02:01 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

खांद्यावर ओझे दूजांचे ,
पाऊल  अडखळत राहीले ,
त्यांच्याच ओझ्या खाली ,
मन माझे दबून गेले ,

सांगण्या व्यथा नित ,
मन शोधीत राहीले,
न आले कधी कुणी ,
मन आक्रदंत राहीले ,

वाट पहाता पहाता ,
दृष्टी ही अधू झाली ,
न दिसले कधी कुणी ,
दाटी आसवांची झाली ,

पहाता खेळ जीवनाचा ,
डोळ्यांत आसवे दाटली ,
परी मिटल्या पापण्या आड ,
वाट आसवा न गवसली ,

साद प्रेमाची ऐकण्या ,
कर्ण अधीर नीत झाले ,
परी शब्द कुणाच्या अंतरीचे ,
कानी कधीही नच आले ,

क्षण हर एक काटेरी ,
गात्रे सारी घायाळ झाली ,
पाहण्या पालवी सुखाची ,
आस मनीची न सुटली..............
आस मनीची न सुटली..............
                       अशोक  मु . रोकडे .
                        मुंबई.