सखे वारुणी ....

Started by Asu@16, August 02, 2016, 10:31:49 PM

Previous topic - Next topic

Asu@16

      सखे वारुणी ....

भेट नव्हती कधी माझी
तुला मी ओळखून होतो.
भल्याभल्यांशी मैत्री तुझी
खूप खूप जाणून होतो.
      मायावी तू, दुष्ट राक्षसी
      तुझ्या विभ्रमी फसणार नव्हतो.
      पुतना तू, तू नरभक्षसी
      दुग्ध तुझे पिणार नव्हतो.
मोहिनी तू, तू कामांगी
तुला मी भुलणार नव्हतो. 
नाचनाचुनि नर्तनरंगी   
कर शिरी ठेवणार नव्हतो.
      मरणान्तक तू साथ देशी
      कीर्ती मी ऐकून होतो.
      लाडिक लाडिक तुझ्या खुणांशी
      आत्मबळी पडणार नव्हतो.
भेटता त्या उदास रजनी
डोळे मी झाकून होतो.
कुशीत शिरता सखे वारुणी
अंत माझा जाणून होतो.

- अरुण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita