इतिहास

Started by prathamesh.manmode, August 03, 2016, 12:57:22 AM

Previous topic - Next topic

prathamesh.manmode

दिनांक १/१/२००९

माझ्या आयुष्यातला खूपच महत्वाचा दिवस ठरला गेला महाराज गडकिल्ले इतिहास सह्याद्री भटकंती फोटोग्राफीची आवड निर्माण करणारा तो दिवस अजूनही आठवणीत आहे...

हा मी काढलेला फोटो तेव्हा काढलाय जेव्हा मला महाराजांचा "म" गडकिल्ल्यांचा "ग" इतिहासाचा "इ" (शाळेत शिकवलं तेवढा सोडून) भटकंतीचा "भ" आणि फोटोग्राफीचा "फ" देखील माहित नव्हता..

हा झाला पहिला विषय

आता दुसरा विषय
मला सांगा तुम्ही या गोष्टीचा विचार कधी पासून चालू केलात ..?
कश्याचा ? अहो इतिहासाचा

नाही बुआ आम्ही तिसी चे झालो आम्ही चाळीशीच्या झालो आम्ही साठीचेही झालो पण आम्ही काय याचा विचार केला नाही इतिहास हो इतिहास गेला घडून आता भविष्यकाळ बघा कि जाऊद्या यांचं जाऊद्या मला वाटतंय ४ थी ते ८ वी असावा ना इतिहास राजमाता जिजाऊ शिवाजी महाराज शंभूराजे संत तुकाराम त्यांचे गडकिल्ले शिवनेरी तोरणा सिहंगड शाहिस्ते खान अफजलखान औरंगजेब इंग्रज होतं कि हे सगळंच आणि झाला वाचून आणि आम्ही १०० मार्कांचा पेपर पण दिला विषय संपला एकदाचा चला पुढच्या वर्गात काहींना हा विचार पडायचा कि अजून हा इतिहास संपला कसा नाही (ज्यांना त्यात चव नाही अशे ते) आणि काहींना वाटायचं कि हा इतिहास एवढाच का आहे पाठ्य पुस्तकात अजून का नाही (त्यातला मी एक होतो) आणि तेव्हा कळत न्हवता कि इतिहासाची अजून पुस्तकेही असतील. असो मग पुढच्या वर्गात गेलो इतिहासाचा विषय संपला आणि ते आपण त्या १०० मार्कच्या पेपर मध्ये सोडूनही आलो आता काय माहित नाही आणि विचारूही नका... आता हे तुम्ही त्यांना कधीही विचारा बाबारे शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या साली झाला होता ? उत्तर असेल अरे बाबा कुठे विचारतो तू ४ थी ५ वीतले प्रश्न?   

ठीके आहे वय नसेल इतिहास जणून घेण्याचा नसेल वय आपल्यासाठी ज्यांनी रक्त सांडलंय त्याचा विचार करण्याचं ठीक आहे की हवी तेवढी मज्जा मस्ती करा पण आज न उद्या इतिहासाला जाना कारण इतिहास आपल्यासाठीच घडलेला आहे रक्त सांडलंय ते आपल्यासाठीच सांडलंय आणि त्याची आपल्याला जाणीव असली पाहिजेच ..


जी काय प्रेरणा भेटली ती फक्त या एका छायाचित्रांमुळे.. तेव्हा ठरवलं आपला इतिहास महत्वाचा आहे आणि तो आपल्याला जपायचा आहे.. आणि आता ६ वर्ष होऊन गेलीत भटकंती ला फोटोग्राफीला आणि खूपच छान वाटतंय....


जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराय