माझी कळी अशीच..

Started by Balaji lakhane, August 03, 2016, 04:20:08 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

माझ्या प्रियेशीची गोष्टच वेगळी,
ति आहे नाजुक कळी.!

खुप सुंदर हसते गालात,
मला बोलवते प्रेमाच्या बनात.!

लाजत लाजत बोलते ति,
प्रेम व्यक्त करायला घाबरते ति.!

अश्रु मी कधीच पाहीलं नाही,
सदा सखी माझी आनंद उधळत राही.!

मन माझे वेडे तिच्या प्रेमात,
रोज बोलतो तिला स्वप्नात .!

स्वप्नात पण हट् करते,
कारण काढून मला सतवते.!

मनापासुन माझ्यावर प्रेम करते,
फक्त मी तुझीचं राणी म्हणते.!

अशीच माझी गुलाबाची कळी,
सुंदर झाल्या जिवनाच्या ऒळी.!
*******************************
बालाजी लखने (गुरू)
उदगीर जिल्हा लातुर
8888527304

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

विजय वाठोरे सरसमकर

 खूपच छान !!!   मस्त गुरु सर  !!!