खोटी आशा

Started by vikrams13, August 03, 2016, 07:46:56 PM

Previous topic - Next topic

vikrams13

खोटी आशा

खोटी आशा खोटी स्वप्ने
दाखवून तु मला सोडून गेलीस
तुला माझ्यावर प्रेम करायचे नव्हते
मग माझ्या आयुष्यात का आलीस

असही नव्हते की तुझे खोटे
वागणे समजत नव्हते मला
पण उगाचच कठोर वागुन
कधी दुःखवायचे नव्हते तुला

अजुनही वेड्या भ्रमात आहे
की तु परत भेटशील मला
परत तु माझ्या प्रेमात पडशील
अशी खोटी अशा लागले मला

का अशी वागलीस याचाच विचार
करत एकटाच कोपऱ्यात बसतोय
कुणासमोर मनातले दुःख सांगावे
तर तोही माझ्यावर हसतोय

- विक्रम सरक
Vnsarak

Shrikant R. Deshmane

khupach chan vikramji...
chan lihta tumhi..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

vikrams13

धन्यवाद सर ! आपला आभारी आहे
Vnsarak

sneha31


vikrams13

धन्यवाद स्नेहा मिस
Vnsarak

Vidhya


vikrams13

धन्यवाद विदयाजी
Vnsarak