आहेस तर कुठे ... आहेस...

Started by Balaji lakhane, August 04, 2016, 02:22:08 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

आहेस तर कुठे देवा....

उगज तुझ्या नामांचा गजर,
भक्तांना तुझाचं ध्यास आहे.!
तु तर आहेस दगडाचा,
त्या सारख तुझं मन आहे.!!

आहेस तर कुठे देवा....

काही बोलत नाही सांगत नाही,
तुला घोरं नाही चिंता नाही.!
वाईट काय चागंल काय,
तुला कशाचिच जान नाही.!!

आहेस तर कुठे देवा....

आकार दिलायं धोंड्याला फक्त,
ह्रदय नाही ना मन नाही.!
कश्याला त्याचा गाज्या वाज्या,
डोळे नाहीत ना कान नाहीत.!!

आहेस तर कुठे देवा....

कधीच पाहिलं नाही मी तुला,
पिडीतांना गरीबांना मदत करताना.!
कधीच बघितलं नाही तुला,
हरवलेल्या योग्य मार्ग दाखवताना.!!

आहेस तर कुठे देवा...

नामस्मरणात तुझ्या तल्लीनं होतात,
त्यांच्या मनातली अवस्था समजलास का.!
दुरुन पायी चालुन दर्शनासाठी येतात,
कधी त्यांना पाणी विचारलास का.!!

आहेस तर कुठे देवा....

**********************************
बालाजी लखने (गुरू)
उदगीर जिल्हा लातुर
8888527304