कळतच नाही ...........

Started by विजय वाठोरे सरसमकर, August 05, 2016, 03:19:19 PM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर


http://i68.tinypic.com/6dwjlh.jpg

कळतच नाही ...........

बाहूत तुझ्या मी हरखून जातो
वास्तवाच भानच राहत नाही
घेउनी नभात उंच भरारी
वास्तवाच्या भूवर कस उतरायचं कळतच नाही


बाहूत तुझ्या मी एकरूप होतो
मग आनंदाला पारावार उरत नाही
व्यक्त न केलेल्या भावना सांगाव्याशा वाटतात
पण मनातच ठेवाव्या की ओठांवर आणाव्यात कळतच नाही

मला पाहून जेंव्हा तू लाजतेस
मग परीत अन तुझ्यात अंतरच उरत नाही
तू हसतेस तेंव्हा माझ्या श्वासांची स्पंदने
तुझ्याच भोवती रुंजी का घालतात कळतच नाही

चेहर्यावर हसू उधळणारा मी
उगाचच रडण्याचा प्रश्नही उरत नाही
तुझा निरोप घेतांना
ओठावर हसू आणावं की डोळ्यात अश्रू कळतच नाही .


                     विजय वाठोरे सरसमकर
                     हिमायतनगर
                     ९९७५५९३३५९

Tejas Jadhav

Maji post apl var ka nahi post hota ahe

Shrikant R. Deshmane

मला पाहून जेंव्हा तू लाजतेस
मग परीत अन तुझ्यात अंतरच उरत नाही
तू हसतेस तेंव्हा माझ्या श्वासांची स्पंदने
तुझ्याच भोवती रुंजी का घालतात कळतच नाही

kya baat..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]