अनाहुत

Started by श्री. प्रकाश साळवी, August 06, 2016, 09:06:02 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

आनाहुत
-------
तु आलीस अनाहुता सारखी
अन् देऊन गेलीस नांव
नव्हते ठाऊक तुझे गाव
जरी नव्हता ठाऊक भाव
**
तु आलिस फुलांसारखी
अन् देऊन गेलीस सुगंध
बनुन फुलपाखरू तु
करून गेलीस बेधुंद
**
तु आलीस श्रावणसरी सारखी
गेलीस बरसुन सरसर
ऊन पावसाचा खेळ खेळून
अन् गेलीस निघुन भरभर
**
तु आलीस वादळ बनुन
करून गेलीस ऊध्वस्त
हृदयाच्या करून चोळामोळा
झालीस खुशाल बिनधास्त
**
तु आलीस प्रेम घेऊन
जिंकुन गेलीस माझी प्रिती
तुडवित गेलीस तिच वाट
हीच का तुझी प्रेमाची निती
**
प्रकाश साळवी ✍