विरह

Started by श्री. प्रकाश साळवी, August 06, 2016, 09:29:22 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

विरह
-------
तुझ्या शब्दवेड्या वचनांना मी काय सांगु ?
चुकल्या आणा-भाकांची मी काय दाद मागु?
हे घनविभोर आभाळ ईथे दाटलेले
बरसती श्रावण सरींचे किती मी भोग भोगु ?
शब्दांस देखील जखमा जाहल्या का तू पाहिल्या ?
वेदनांचे कण्हणे विव्हळणे कसे मी तुला सांगु ?
वागणे तुझे हे थोडे ना रूचले मला कधिही
चांदण्यात जळताना कसे मी वचनास सांग जागु ?
मी हारलो जिंकलो मी कधी ना जाणले
माझीच हार आता कशी कुणास सांगु?
शेवटी मला तू असे दूःख देऊन गेली
पुन्हा सुखाची शास्वती मी कशी सांग मागु ?
**
प्रकाश साळवी

obey