हात तुझा दे त्याच्याच हाती...

Started by RAM NAKHATE, August 06, 2016, 11:48:18 PM

Previous topic - Next topic

RAM NAKHATE

हात तुझा दे त्याच्याच हाती...
•••••••••••••••••••••••••••••••••
तुझ्यातला हा प्रेम वेडा
तुझ्याच साठी भरकटलेला...
प्रेम वेडा वेडावलेला
प्रेम सुटता हातातुनी...
सुटताच गाटी सार्या
बांधतो दोर त्याला...
उजळुनी टाकेल
प्रेम वेड्या जगाला...
हात तुझा दे त्याच्याच हाती....

विरह नको त्या प्रेमांचा
मौन याची बोलके झाली...
बोलतो मनातुनी बोल सारे
आतल्या या प्रेमासाठी...
तोंडी नाही बोल ही
मनातुनी फुटले सारे...
हात तुझा दे त्याच्याच हाती....

न पाझरल्या पाण्याची
वाट ही का वाकडी...
हाती दे हात तुझा
वाट करीन मी सारखी...

हाती येता हात तुझा हा
मन विसरेल सार्या गाठी...
मनातुनी प्रेम बोलते
तोडु नको ही नाती...
उजळुन टाकु नाती
हात तुझा दे त्याच्याच हाती....
~~~~~~~~~~~~~~~~~~
                     - राम नखाते
             मो. नं. ९५४५०१३६७९
           मु. मांडणी, ता.अहमदपुर
                     जि. लातुर