मैत्री

Started by पल्लवी कुंभार, August 07, 2016, 12:12:51 AM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

आठवणींना फुटला पान्हा
शिंपल्यातला मित्र गवसला

सुरकुतलेला चेहरा बोलला
पावसाळा तू ही पाहिला

घेऊन हात हाती तुझा
सर सर सरला, काळ कालचा

कुठे कटिंग-बनमस्का
चकणा-चिअर्सने, ताव मारला

झडल्या चर्चा विचारांच्या
रंगल्या मैफिली मैत्रीच्या

तुझ्या माझ्या नात्याचा
गुंफला गोफ बंधांचा

आपुलकीचा रेशीमधागा
घट्ट मनाने बांधला

ग्रीष्माच्या दाहक ऋतूला
वसंत तू फुलवला

दिला उजाळा त्या क्षणांना
चिंचा वेचण्या फांद्या चढल्या

प्रेमाखातर तुझ्या रे मित्रा
तासांनाही दांड्या मारल्या

भेटल्या जरी फसव्या वाटा
वळणावर आयुष्याच्या

ऋणानुबंध सदा जोडला
मैत्रीच्या नात्याचा

~ पल्लवी कुंभार