प्रेम आणि Confusion...??

Started by Bobha, August 07, 2016, 08:23:48 AM

Previous topic - Next topic

Bobha

का होते असे मनातले येत नाही काही केल्या ओठांवर,
मग कसे बरं कळणार तिला, तीच आहे माझ्या हृदयातल्या ठोक्यांवर ???
घाई थोडी जर झाली तर हातचे निसटू शकते ;
आणि उशीर थोडा जर केला तर स्वत:ला कोसण्याशिवाय हाती काहीच नसते.
कधी बरं बोलावे हा असतो गहन प्रश्न फार,
मनचे मनीच राहिल्याने मग वाटू लागतो तो एक भार.
अशा वेळी मग स्वत:च स्वत:ला समजून घेण्यासाठी वेळ थोडा द्यावा,
खरचं प्रेम आहे हे की क्षणभंगुरसे आकर्षण याचा अंदाज घ्यावा.
स्वत:सोबतच्या त्या संवादानंतर उत्तर जे मिळेल,
ख-या अर्थी पुढे जाण्याचा मार्ग त्याने कळेल.
सुटत जाईल मग हळुहळू एकेक गुंता,
मनही जे सांगू लागेल, तो बस्स! उसकी मान, तू किसी और की क्यू है सुनता??
उलगडतील मग हळुवारपणे नात्यातल्या त्या गमती,
लागणारही नाहीत त्यांना आजकालच्या त्या चढत्या-उतरत्या किमती.
आयुष्याच्या ह्या प्रवासात साथ देणारा एक सोबती जे मिळेल,
बेरंगी अशा आयुष्यातही नव-नवे रंग जो भरेल.
घेऊन मग हातात हात त्याचा हा आपला प्रवास सुरु होईल ;
आणि गोंधळवून टाकणारी अशी ती phase आठवून एक गोड, निरागस हसू मात्र नक्की येईल.