" नकळत प्रेम पियू तुझं "

Started by duggupiu, August 07, 2016, 05:13:50 PM

Previous topic - Next topic

duggupiu

              " नकळत  प्रेम "

कळत कस नाही, किती ग प्रेम करतेस मला,
शब्दांच्याही पलीकडे न सांगता यावे, इतकं ग प्रेम करतेस मला,
उदास झालो मी तर, किती ग हसवतेस मला,
कळत कस नाही, किती ग प्रेम करतेस मला.

अपयशाच्या प्रत्येक पावलांवर, तूच धीर देतेस मला,
अन तुझ्या यशाच्या उंबरठ्यावर, नाव देतेस मला,
न सांगता किती ग दुःख सोसतेस, अन चेहऱ्यावर किती सोज्वळ हसतेस.
कळत कस नाही, किती ग प्रेम करतेस मला.

आयुष्याच्या वाटेवर किती ग साथ दिलस मला,
पहिले किती युग आम्ही प्रेमात, हे वाटले निसर्गाला,
हेवा वाटे जगताला, पहिले जेव्हा रूप तुझे,
आभिमान वाटे स्वताला, जे प्रेम केलास मला.

आज कळलं पियू , किती ग प्रेम करतेस मला.
शब्दांच्याही पलीकडे न सांगता यावे, इतकं ग प्रेम करतेस मला.


                                             - बळीशा डावकरे



duggupiu

तुझं माझं नातं काहीसं असं आहे...
सुगंधाचं फुलाशी जसं आहे...

कधी नी कशी गुंतत गेले कळलेच नाही..
आधी कोणासोबत कधी असे बंध जुळलेच नाही..

खोलवर रुतुन बसलेय भावनांच्या डोहात..
जरा अतीचं गुंतुन गेलेय का मी तुझ्या मोहात..??

                                                  ------मयू