आभाळ मनातलं

Started by शिवाजी सांगळे, August 07, 2016, 07:45:43 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

आभाळ मनातलं

बरेच मळभ दाटलेले,
अन्, सर पावसाची आली
थोड्यातच सरून गेली,
दुसरी सर मनात आली...
बरीच थांबलेली, ओथंबलेली
का असं झालं?
अगदि भरून आलं?
पाझरू लागले अश्रु,
आणि वाटू लागलं हलकं,
कसं असतं ना,
वर ढग दाटतात,
मनात? विचार दाटतात...
मोकळं होईस्तोवर
पिंगा घालतात!
कसले कसले विचार ते?
स्वत: फसवल्याचे!
कि फसले गेल्याचे?
नकळत काही केल्याचे?
पाप पुण्याच्या कल्पना...
मग, घेवु लागतात जन्म
स्वत:ला वाचवू पाहतात,
सोई प्रमाने जगायला
शिकवु लागतात,
उतरणार्‍या क्षार दवांना
थिजवु लागतात...
का हे असं होत?
मनातलं आभाळ दाटतं?

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९