गझल

Started by श्री. प्रकाश साळवी, August 07, 2016, 09:49:58 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

गझल
------
दूःखात चालताना आसवांचे पुर आले
सुखात चालताना हसण्यात सुर आले
किती आवरू मी या अवखळ आसवांना
वसंतात हसण्याला हिरवे पर्ण आले
आवर घाल तू आपल्या निळ्या आसवांना
शब्दात हासताना आभाळ भरून आले
घेऊन काय आलो जाणार काय साथ
जगण्यात श्रावणाला भरते भरून आले
मी एकटा फकीर गातो अशा वीराणी
सुख-दूःखात जागताना नशा धुंद आले
पाहिले काय आँसू दूःखात हासताना
जगण्यात मौज मोठी आनंदास भरते आले
**
प्रकाश साळवी