एक नातं

Started by niteshk, August 07, 2016, 10:33:03 PM

Previous topic - Next topic

niteshk

एक पाऊस कोसळणारा
एक झाड वाचवणारे
एक समुद्र उधाणलेला
एक थेंब ओघळणारे

एक हसू खुलणारे
एक खळी गुंगवणारी
एक वारा झोंबणारा
एक नजर खिळवणारी

एक भेट नेहमीची
एक जागा गाठलेली
एक उशीर होणारा
जरी एक वेळ ठरलेली

एक रुसवा सारलेला
एक गप्पाष्टक रंगलेले
एक मिठी झिंगणारी
हात हातात गुंतलेले

एक कळी खुललेली
एक चेहरा लाजणारा
एक प्रिती बहरलेली
एक स्पर्श शहारणारा

एक बंध जुळलेलं
एक प्रेम जडलेलं
एक स्वप्न जगलेलं 
एक नातं... तू आणि मी जपलेलं