* आठवेल तुला *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 07, 2016, 10:42:59 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे


कारे असा छळतोस मला
नेहमीच रडवतोस तु मला
आठवशील तु मला तेव्हा
निघुन जाईल मी जेव्हा
सगळंच आठवेल मग तुला
जे जे बोलला होतास मला

होतील निशब्द शब्द सारे
मग सांग बोलशील कुणाला
काय करावं सुचेल का तुला
कसं समजावशील स्वताच्या मनाला

माझे हसणे माझे लाजणे
बघ राहुनराहुन आठवेल तुला
माझे केस माझे डोळे
माझाच चेहरा दिसेल तुला

शेवटी लागशील तु रडायला
आठवणीत माझ्या शिकशील जगायला
येईल तेव्हा मी परतुनी
तुला माझ्या मिठीत घ्यायला.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938