***** दुःख तुझ्या जाण्याचं *****

Started by Shri_Mech, August 07, 2016, 11:15:29 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

दुःख तुझ्या जाण्याचं


तू नाजूक मेणाच्या बाहुलीसारखी
मी ओबडधोबड कातळासारखा
एवढं असूनही आपलं नातं जुळलं
पण ते चिरकाल नाही टिकलं


तुला मनाच्या सागरात साठवून
मी भटकतो एकटाच अंधारात
शोधात राहतो औषध जखमेचं
पण मीठच बऱ्याचदा हाती येतं


संपलं होतं आपलं नातं
याचा आक्रोश केला नाही
पण तू आपल्या नात्याला विसरलीस
यामुळे झाली मनाची काहिली


जाणारच होतीस एक दिवस
भविष्य नव्हतंच आपल्या नात्याला
पण आठवणीतही तुझ्या उरलो नाही
याचा त्रास पाठ सोडत नाही


तू गेलीस दूर माझ्यापासून
याचं दुःख नव्हतं असं नाही
पण कुणा दुसऱ्याला तू जवळ केलंस
तेव्हा स्वतःला सावरू शकलो नाही


Shri_Mech
Shri_Mech