vidambana kavita

Started by vikrambolegave, August 08, 2016, 12:24:59 PM

Previous topic - Next topic

vikrambolegave

  नभ
पाणी मला हे दिसल
नभ बघुन हसलं
वर्ष भर नजरा
तुझ्यावर फासलं,
मिरगाच्या महिन्यात
पुन्हा एकदा हसवलं.
तुझे दात लागले चमकाया
माझे काळे ऊर आले भराया.
यंदा लवकर हसला
कळेना कुणा-कुणाला सांगू,
वाट पाहिलेली आग
सांग कश्याने विझवू.
थेंब लागले पडाया
भिडू लागले जमिनीशी,
अंकुरलेले दाने
येतील जमीनीच्या टपाशी.
ऊरात भरलेली ईच्या
झाली एकदम तराट,
तुला बघुन आज
मीच झालो सैराट,
पुढच्या वेळी
नको लाऊ काळजात आग,
जे काय आहे
ते याच वर्षी टाक.

       -विक्रम बोळेगावे, लातूर
             7738336172.