का छळतो?

Started by श्री. प्रकाश साळवी, August 09, 2016, 05:18:31 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

का छळतो ?
----------
का छळतो तुझ्या पदराला हा खोडकर वारा ?
वा-यासवे  तुझ्या पदरास नाही थारा
**
तू ही जराशी जराशी अशी हो सुगंधी
हा रम्य भासे मज खुणावतो किनारा
**
कुठुन येते अशी शीळ ही बासरीची?
कुण्या रागिणीने छेडिल्या सप्ततारा?
**
रूळते जराशी तुझी बट ही नागिणिची
नयनात साकळतो तुझ्या यौवनाचा दरारा
**
काय आहे मनात तुझ्या पापण्यांचे मनसुबे?
नभाआडून पहातो तुला हा शुक्रतारा
**
तुझ्या खळीला न लागावी दृष्ट माझी
कसा डोलतो हा पाहिलास का शिकारा
**
प्रकाश साळवी