हरवलय खरं प्रेम माझं...

Started by सुरेश अं सोनावणे, August 09, 2016, 06:04:37 PM

Previous topic - Next topic
हरवलय खरं प्रेम माझं...
.
हरवलय खरं प्रेम माझं,
कुणीतरी शोधून देईल का ?
.
झुरतोय मी तिच्यासाठी,
ती पुन्हा माझी होईल का ?
.
तुटलय स्वप्न माझं,
कुणीतरी जोडून देईल का ?
.
रडतोय मी तिच्यासाठी,
ती पुन्हा मला हसवील का ?
.
मोडलय मन माझं,
कुणीतरी सावरेल का ?
.
वाट पाहतोय मी तिची,
ती पुन्हा हो म्हणेल का ?
.
स्वलिखित -
दिनांक ०९.०८.२०१६...
सांयकाळी ०६,०१...
©सुरेश अं सोनावणे.....