कविता II हातगाडी आणि नशीब , यांची झुंज लागली व्हती II

Started by siddheshwar vilas patankar, August 09, 2016, 06:45:55 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

काम करून तो अर्धा झाहला 

तरी पॉट भरं ना  लेकरांचे

हातगाडी आणि नशीब

यांची झुंज लागली व्हती

श्रम आणि घाम यांचीच

फक्त सोबत व्हती

लढत व्हता वाघावानी

पण येगळीच व्हती  नियती

झाली रगताची ओकारी

अन पाठी लागली पीडा विखारी

वैदयाकडून इलाज केले

कुटुंब पुरे भरडले गेले

बायका पोरं उघडी पडली

जागोजागी भीक मागू लागली

डोळे मिटून तो बघत व्हता

आतल्या आत तो रडत व्हता

निकाल मिळाला कि किडन्या संपल्या 

ऐकुनी ते , खाली कोसळला

वैद्य सांगे खा व प्या

भरपूर फळे अन पाल्यांचे रस

त्याला कसं सांगू

इथे दोन वेळ खान्यासाठी

कसं चालल्येत दिवस

असाच खाली हाताने   

त्यो घरी आला

दिवेलागणीची येळ व्हती

त्या अंधाऱ्या देवघरात

त्यो एकटक बघत व्हता

लागता दुरून बायको पोरांची चाहूल

चेहरा गेला खुलून

असाच निघाला बाजाराकडे

ठरवले मनाशी शिकवू आता

त्या कठोर नियतीस धडे

जे असे लोकांसाठी उकिरडे

तेच आपले औषध खरे

हेच ठरवून मनाशी

खाली वर त्यो कचरा उपशी

वेचुणी नाना फळे अन भाज्या

स्वच्छ करी अन खाई त्या ताज्या

दिसामागून दिस उलटले

बघता बघता चित्र पालटले

काया वाचा मनी जोर तो

कामास जणू अंगात संचारले

घ्या बोध तुम्ही ह्यातून सर्वजण

करा त्या प्रत्येक घोर समस्येचे

आपआपल्या परीने परिमार्जन

नसे अशक्य काहीच ह्या जगी

हिम्मत असेल तरचं  व्हाल सुखी





सिद्धेश्वर विलास पाटणकर C










सिद्धेश्वर विलास पाटणकर C