तुझी आठवण

Started by Kaya, August 10, 2016, 01:38:28 PM

Previous topic - Next topic

Kaya

बेधुंद पावसाची सर ही ऒली,
आज पुन्हा तुझी आठवण देऊन गेली...

मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी दूर,
ऐकू येतो तुझ्या शब्दांचा सूर...

मेघातल्या सप्तरंगी इंद्रधनु सवे,
चित्र कोरते मनी तुझे गोजीरे...

कल्पनेतल्या तुझ्या हळव्या सहवासाने,
मग पुन्हा भेटते मी स्वतःशी नव्याने...

                                                 काया