दूर

Started by Balaji lakhane, August 10, 2016, 03:10:35 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

.....................दूर.......................

आज जेवन करते वेळी उचकी लागत होती,
मला वाटत होत तुच आठवण माझी काढत होती.!

म्हणुन मी तुला लगेच पत्र लिहीतोय,
तुझी सतत येणारी आठवणीचा उल्लेख करतोय.!

वर्ष उलटला तुझ्या पासुन दूर जाऊन ,
शांत करतोय मनाला ह्रदयातली प्रतिमा पाहून.!

रोज तू मला पत्र पाठवते मी तुला पाठवतो,
तू आणि मी फक्त मनातल्या भावनाच मांडतो.!

तु पाठवलेले प्रत्येक पत्र ह्रदयाला लागून ठेवतोय,
जेव्हा जेव्हा वेळ मिळेल फक्त तुझे मन वाचतोय.!

या बर्फात राहून सुध्दा गरमच उब मिळते,
सखे तुझ्या प्रेमाची शक्ती सोबत असते.!

उंच हिमालयावर बर्फाची शाल कायम असते,
बर्फामध्ये लग्नाच्या साडीत माझ्याकडे येताना तू दिसते.!

तुला आता लवकरात लवकर भेटाया मी येणार,
तुला आमच्या घरची सुन बनुण घेऊन जाणार.!
***********************************
बालाजी लखने (गुरू)
उदगीर जिल्हा लातुर
8888527304