थकत नाही

Started by sneha kukade, August 10, 2016, 08:53:47 PM

Previous topic - Next topic

sneha kukade

थकत नाही भास्कार जग प्रज्वलित करायला !
थकत नाही हवा  स्वच्छंद तिचा
प्रवाहाला !
थकत नाही पक्षी दुर आकाशात
उड़ायला !
थकत नाही सुख: सुखाला स्वीकारायला !
थकत नाही श्वास ,श्वासास ,घ्यायला!
थकत नाही भावना ह्रूदयाला
दुखावायला !
थकत नाही अपेक्षा अपेक्षेचा
खच उभारायला !
थकत नाही नाति नात्याना
दुरवायला !
थकत नाही देव परीक्षा पहायला
आणि थकत नाही परिक्षा कुणाची
परीक्षा  घ्यायला !
थकत नाही संघर्ष आयुश्याला आणि
थकत नाही आयुष्य संघर्ष करायला

थकत नाही शरीर मरणाचा दरात
जायला,आणि
थकत नाही मरण हसत हसत
मरणाला स्वीकारयला !

पण आज़ थकून जाव या सत्याने
कटु सत्याला आणि मुक्त करून दयावे आयुष्य अखंडीत जगायला !
.. wrt by- sneh@