तुला बोलण्याची डेरिन्ग माझ्या मधे नाही ...

Started by dattarajp, August 10, 2016, 09:23:39 PM

Previous topic - Next topic

dattarajp


तुला बोलण्याची डेरिन्ग
माझ्या मधे नाही ...

तुला बोलण्याची डेरिन्ग
माझ्या मधे नाही .
तरी पण मन तुझ्या
होकाराची वाट पाही .

तू समोर आल्यावर ते
शब्द लपवून ठेवी .
तू दूर गेल्यावर  मन ,
पुन्हा नाराज होई .

तुझ्या त्या सावलीस
मन मिठीत घेई .
तुझ्या वीणा मनी
माझ्या कोणीच नाही .

स्वप्न तुझे मन माझे
रोज रोज पाही .
तुझ्या वीणा जगण्यात
अर्थच नाही

      बबलू
9623567737