विखुरलेली नाती

Started by NageshT, August 11, 2016, 09:35:23 AM

Previous topic - Next topic

NageshT

*विखुरलेली नाती*
मनात माझ्या खुप होती नाती
जपताना होती त्याच्या काळजाची माती
मातीची ही झाली रेती
वाय्रा सह ती उडुन जाती
उडता उडता गगनाला भिडाली
गगन म्हणाले विखुरली सारी
विखुरलेली नाती रडु लागली
स्वतःच ह्रदय ते बडवु लागली
ह्रदय त्याना सांगु लागलं
घडलेली हाकीकत ते गिरवु लागलं
गिरवलेली हाकिकत खुप होती खोल
नात्यांच तेव्हा कळलं मोल
*******************
                नागेश शेषराव टिपरे
          मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
               मो.नं:-८६००१३८५२५