FIRST SALARY

Started by vinaysdange, August 11, 2016, 09:56:54 PM

Previous topic - Next topic

vinaysdange

पहिला पगार


आज मी रीलक्सेड आहे
आज मी मजेत आहे
आज मी खुशीत आहे
आज मी, मी,
सगळं काही आहे
आहो, पण एवढं झालं तरी काय?
माहित नाही तुला ?
अगं, आज माझ्या मुलीने पहिला पगार आणला


हो, हो, तीच ती,
टिंगी, मिंगी, चिंगी, माझं बुंडुकल,
धडपडणारी, ओरडणारी,
औषधाला घाबरून 'बल झालं' म्हणणारी
आज तिने देवापुढं ताटलीत ठेवला
अगं, काय म्हणून काय विचारतेस?
आज तीने तिचा पहिला पगार आणला


आई तू 'हे' आण,
बाबा तुम्हाला 'ते' घेऊया
दादाला फोन केलाय,
काय पाहिजे ते सांग
आसा किती झालाय किती ?
आनंद ना ? अभाला एवढा झालाय
आज माझ्या मुलीचा पहिला पगार झाला


कशी जाणार ? कुठे राहणार ?
काय खाणार अन आता कसं होणार ?
प्रश्न ? प्रश्न? प्रश्नांनी छळल होते काळजाला
पण आज तेच झालय आनंदाचा झुला
कारण -----?
आज माझ्या मुलीचा पहिला पगार झाला


कवी
विनय डांगे
मो क्रं 9011192211