तु भेटलीच नसती तर

Started by vikrams13, August 12, 2016, 10:08:04 AM

Previous topic - Next topic

vikrams13

तु भेटलीच नसती तर

तु भेटलीच नसती तर
तूझी न माझी ओळख झाली नसती
ओळख झालीच नसती तर
तु माझी मैत्रीण झाली नसती

जर मैत्रीणच झाली नसती
तर तुझा स्वभाव कळला नसता
अन स्वभाव कळला नसता तर
तुझ्यावर इतका जीव जडला नसता

जीव जडलाच नसता जर
सुरवातीस कठोर वागली असतीस
आता मला पण ञास देत स्वतःला
ञास करून घेत बसली नसतीस

आपण एकमेकांना कधी भेटलोच
पण हेच किती बरे झाले असते
ना तुला ना मला हा विरहाचा ञास
झाला नसता , जर तु भेटलीच नसते

                        - विक्रम सरक
Vnsarak

Shri_Mech

#1
तू भेटलीच नसतीस तर
मनसोक्तपणे जगलो असतो
पण आता तुझ्या आठवणी
पाठ सोडत नाहीत....
Shri_Mech

vikrams13

#2
खूप छान
Vnsarak