*समाज आमचा बदलत होता*

Started by NageshT, August 12, 2016, 11:06:55 PM

Previous topic - Next topic

NageshT

चाली-रीती बदलल्या होत्या; पद्धत ही बदलली होती,
फॉशन च्या युगात कपडे सुध्दा बदलली होती.
बदल घडवनाय्राना मात्र समाज दोष देत होता,
अनं आम्ही म्हणतो समाज आमचा बदलत होता.

भ्रष्टाचार करून भ्रष्टाचारलाच कोसत होता,
प्रत्येक्षात मात्र हाच जातीभेदा ला पोसत होता.
तंत्रज्ञानाच्या युगात हा ही एक; बदल घडत होता,
अनं आम्ही म्हणतो समाज आमचा बदलत होता.

आज ही येथे संस्कृतीचा पगडा होता,
अंध बनुन त्याच संस्कृतीला पायाखाली तुडवत होता.
देव ही ईथे आता सैतानच झाला होता,
अनं आम्ही म्हणतो समाज आमचा बदलत होता.

स्वर्थापोटी हाच समाज आज ही वनवन फिरत होता,
स्पर्धेच्या जगात स्वतःला गती देण्याच काम करत होता,
कसली गती? अन कसले काय?
त्याचे फक्त ढोंग रचत होता,
अनं आम्ही म्हणतो समाज आमचा बदलत होता.

येथे तंत्रज्ञाना पेक्षा अंधश्रधेवर जास्त विश्वास होता,
त्यामुळेच समाज काही केल्याने बदलत नव्हता.
अरे!!! आम्हीच बदललो नव्हतो तर समाज कसा बदलणार होता,
आम्ही फक्त म्हणत होतो समाज आमचा बदलत होता.

नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५