गिरनार अमृत आकांक्षा

Started by विक्रांत, August 14, 2016, 12:19:46 AM

Previous topic - Next topic

विक्रांत


धन्य गिरनार
घनगर्द दाट
तिथल्या वनात
राहतात नाथ ||१

सदा सर्वकाळ
वांच्छा ही मनात
जावुनिया तेथे
यावे न जगात ||२

सरो अटाअटी
जन्म कटकटी
लागावी देहास
अलक्ष विभूती ||३

धडाडून मनी
निरंजन धुनी
अनाहत पुंगी
वाजो कणोकणी ||४

मच्छिंद्र मनास
करो आदेशित 
गोरक्ष चित्तास
दक्ष सदोदीत ||५

वसावा निवृत्ती
विरक्त वृतीत
ज्ञानोबा बुद्धीत
समाधी भोगीत ||६

अहाहा जगणे
संपूर्ण लाधावे
आदिनाथ कृपे
श्रीदत्त भेटावे ||७

विक्रांत पाहतो
जागेपणी स्वप्न
अमृत आकांक्षा
आहेत म्हणून ||८

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in