विजयाची होळी

Started by Asu@16, August 14, 2016, 04:38:23 PM

Previous topic - Next topic

Asu@16

विजयाची होळी

दान मागता सूर्याचे
झोळी घेऊन हाती
कोण तू, कुठे घरदार
वळवळणार तू किती
गटारातल्या क्षुद्र किड्या
किती मारशी उड्या ?
जन्म मृत्यूची ना नोंद तुझी
आयुष्यभर रडणार किती !
ना जन्माचा आनंद
ना मरणाची खंत कुणा
येती जाती किडे मकोडे
गणती करणार किती ?
सहज बोलता चिरडतील तुज
ना अन्यायाची भिती
गटारात तू सुखी रहा
मग तुला कसली क्षिती
जर असेल हिंमत आणि संगत
विचारा त्या नियंत्याला
कां, जगणे मरणे फेरे फिरणे
हीच आमची नियती
का अन्याय आम्हावर केला ?
द्या लाथाडून या जगण्याला
नका मागू दान सूर्याचे
नका घेऊ हाती झोळी
            घ्या हिसकावून त्या सूर्याला
            चेतवा विजयाची होळी.

- अरुण सु. पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita