काय असतं प्रेम ?

Started by maheshkarpe4, August 14, 2016, 09:25:09 PM

Previous topic - Next topic

maheshkarpe4

कोणी विचारलं तुला काय असतं प्रेम?
तर माझं नाव तू सांगशील ना?
तुझ्या नाजूक ओठानी माझं नाव घेशील ना?

होईल का तुला प्रेम इतकं माझ्यावर;
की तुला दूसरं कोणीही आठवणार नाही...
बाबांची लाडकी होतीस आजपर्यंत, आता माझी लाडकी होशील की नाही...

तुला तर माहिती आहे की पाण्यात साखर ही विर्घलते....
पण तरीही वेडी तू पावसात मनसोक्त भिजते....

येता आठवण तुझी क्षणोक्षणी, हृदयात झाकून मी पाहतो;
आले तुझे चित्र डोळ्यांपूढे की माझा मीच सुखावतो ।।

लिहिणं तुझ्याबद्दल नेहमीच कमी वाटे;
बघता-बघता डोळ्यातून माझ्या,तुझ्या आठवणीचे अश्रु दाटे....आठवणीचे अश्रु दाटे....

~महेश कर्पे