कधीतरी कोणावर तरी प्रेम करून पाहायचय...

Started by OMKAR SHINDE, August 15, 2016, 03:34:48 PM

Previous topic - Next topic

OMKAR SHINDE

कधीतरी कोणावर तरी प्रेम करून पाहायचय..
दिवस रात्र रोज मला सोबत तीच्या राहायचय..
सकाळ संध्याकाळ फक्त तीच्यासाठी जगायचय..
तीच्याच प्रेमामधे मला अखंड बुडुन जायचय...
कधीतरी कोणावर तरी प्रेम करून पाहायचय..!!
.
.
कधीतरी तीच्यासोबत खुप खुप फिरायचय...
सोबत तीच्या प्रत्येक क्षण आनंदात राहायचय..
कधीतरी तीच्यावर खुप विश्वास ठेवून पाहायचय..
सोडून जरी गेली तरी आठवणीत तीच्या राहायचय..
कधीतरी कोणावर तरी प्रेम करून पाहायचय..!!
.
.
दुःख मला झाले तरी आनंदी तीला पाहायचय...
लांब जरी गेलो तरी मनात तीच्या राहायचय..
आठवण तीची प्रत्येक क्षणी सोबत घेऊन फिरायचय...
कधीतरी कोणावर तरी प्रेम करून पाहायचय..!!
कधीतरी कोणावर तरी प्रेम करून पाहायचय..!!