प्रेमाची भाषा

Started by RAM NAKHATE, August 16, 2016, 12:01:49 PM

Previous topic - Next topic

RAM NAKHATE

प्रेमाची भाषा
••••••••••••••••••••••••••••••••••
बोलतो मी भाषा प्रेमाची
प्रेमाचे हे बोल,वाणी माझी...!
वाटते करावे वाटा याचा
सुख,दुःखाची भाषा माझी...!

नाही करत गोळा बेरजांची
सुख,दुःख प्रेमात, आवड मनाची...!
आवडते भाषा प्रेमात प्रेमाची
करुनी प्रेम, जानीव सुख, दुःखाची...!

प्रेमात विसावा, विरह प्रेमाला
प्रेम हे जिवनाचे सोबत मनाची...!
विरहाचे प्रेम सोबती न यावे
दुःखी वळनात व्हावी सोबत प्रेमाची...!

प्रेम निसटता हातुन सारे
होइल जानीव तुजं या प्रेमाची...!
करु नको तु प्रेम हेची
जर नसेल सोबत जन्माची...!

आनंद काहींना मिळले प्रेमाचा
प्रेमात  सारे  दुःख  नाही...!
काहींना मिळतील दुःख सारे
आनंद प्रेमाचा काहींना नाही...!
                  - राम नखाते
            मो.नं. ९५४५०१३६७९
        मु. मांडणी, ता. अहमदपुर,
                   जि. लातुर.