विचार करतोय...

Started by Balaji lakhane, August 17, 2016, 10:30:38 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

कविता कशावर करू विचार करतोय,
तुझ्या लाजाळु स्वभावावर तुझ्या कोमल गालावर...

कविता कशावर करू विचार करतोय,
तुझ्या गुलाबी ओठावर तुझ्या कोमल बोलावर...

कविता कशावर करू विचार करतोय,
तुझ्या बरोबर पाहीलेल्या स्वप्नावर तुझ़्या एका झलकेवर...

कविता कशावर करू विचार करतोय,
तुझ्या भुरभुरणाऱ्या केसावर तुझ्या सौंदर्यावर...

कविता कशावर करू विचार करतोय,
तुझ्या तिरप्या चालीवर तुझ्या भावनावर...
*******************************
बालाजी लखने (गुरू)

Shrikant R. Deshmane

 :D chan, etkahi avghad nasta pan suchna mahatvach...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]