तु सहज सोडून गेलीस

Started by vikrams13, August 17, 2016, 11:06:29 AM

Previous topic - Next topic

vikrams13

तु सहज सोडून गेलीस

माझ्या आयुष्यातुन तु सहज
एकटा सोडून गेलीस मला
सुरूवात तर एवढी चांगली झाली
कि त्याचा शेवट असा वाटले नव्हते मला

ईतके कठोर कशी वागलीस
अजुनही याच विचारात पडलो आहे
वाटले तु ही माझ्या प्रेमात आहे पण
कुठे काय मीच वेडा झालो आहे

तु गेलीस पण मी अजुनही
तिथेच थांबून तुझी वाट बघतोय
तु येणार नाही हे मीच माझ्या
वेड्या मनाला समजावतोय

आशा संपली असतानाही
फक्त तुझ्यासाठी मन झुरत आहे
तु सोडून गेलीस पण तुझ्यासाठी
अजुनही माझे मन मरत आहे

               - विक्रम सरक
Vnsarak