तिच्यावर रचतोय कविता

Started by Balaji lakhane, August 17, 2016, 11:45:55 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

........ तिच्यासाठी रचतोय कविता..........

माझ्या प्रिय प्रियसी साठी रचतोय प्रेम कविता,
तिच्या सोबतच यावे मला पुर्ण आयुष्य जगता.!

दुसरी कोणा बरोबर लग्न झाले तर फार अवघड होईल,
तिचे माझे नसता रोज रोज घरी महाभारत होईल.!

म्हणेल कॉलेजच्या वेळेत होती प्रियसी,
मग काय मी बोलू प्रिये तिच्याशी.!

हो म्हणल तर तिच्या सोबत जगण कठीण होईल,
ती पण रडत रडत माहेरी निघून जाईल.!

म्हणेल कोण होती ती तिच्यासाठी रात्र रात्र जागून लिहिता कविता,
तुम्हाला माझ्या भावना काहीच नाहीत कविता लिहीताना तिलाच बघंता.!

प्रत्येक गोष्टीला काहीतरी मला ती उलट बोलेल,
रागवलं तर मी तिला म्हणेल आत्या बाईंना तुमच बोलेल.!

जेवयला पण कपाळावर आट्या आणुन ती वाढेल,
जिवनात आनंद सुखाचा क्षण ही नाही मिळेल.!

घरी लिहीत बसेन कविता प्रिय परी मी तुझ्यासाठी,
ती माझी बायको सुरू करेल घाई भांडे आपटण्यासाठी.!

स्वप्नात तू येण्या एेवजी ती येऊनं मला रागवेलं,
मला तिच्यासाठी पुर्णच जिवन बदलाव लागेल.!

कविता लिहिण तुला त्यात पाहणं बंद करावं लागेल,
तुला वाटत असेल मी तुझ्यासाठी लिहावं तुला माझी जिवनसाथी बनावं लागेल .!

***********************************
बालाजी लखने (गुरू)
उदगीर जिल्हा लातुर
8888527304

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]