ताई...

Started by Balaji lakhane, August 18, 2016, 09:13:02 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

.....................ताई.........................

माझे आणि माझ्या ताईचे भांडन झाले आज,
रागात बोलत होती जा तुला राखीच नाही बांधणार आज.!

तीच नेहमीच असत माझ्या सर्व खोड्या आईला सांगण,
कोणत्या तरी मुलींचे नाव घेऊन सारखचं मला चिडवणं.!

असच करत असते जास्त लाडकी थोडी खोडकर प्रिय बहीन,
मला पण खुपच आवडत तिच्या सोबत भांडण करन.!

जगातल सर्वात सुंदर नातं असत ते बहीन भावाच,
हे नातं असत न संपणाऱ्या बहीन भावाच्या प्रेमाच.!

म्हणत असते लग्नाच विषय काढलं की मला तुमच्या सोबत राहायचं आहे,
लग्न वगैरे ह्या भांणगडीत मला नाही दादा पडायचं आहे.!

ये ताई तुला एक तरी दिवस जाव लागणार सासरी,
तू जाते वेळी अश्रु वाहतील जसे पाऊसाच्या सरी.!

खुपच सुंदर गोडस प्रेम असत बहीन भावाच,
प्रत्येकाला एक तरी बहीन असेल सफळ होईल जगण पुर्ण जन्माच.!

***********************************
बालाजी लखने (गुरू)
उदगीर जिल्हा लातुर
8888527304
***********************************
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.!

विजय वाठोरे सरसमकर

बालाजी सर मस्त

ताई सोबतच्या खोडींची
असते नेहमी आठवण !
अश्या या पवित्र प्रेमाची
हृदयात राहावी सदैव साठवण !

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]