माझी प्रिय ताई..

Started by Balaji lakhane, August 18, 2016, 10:39:41 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

................ माझी प्रिय ताई................

राखीच पवित्र धाग असत कोमल हळव्या प्रेमाच,
राखीच सन असतो फक्त सुख
आनंदाच.!

पौर्णिमेच्या दिवशी मला खुपच आनंदाने ऒवाळते ताई,
हसत म्हणत असते फक्त जास्त सतवू नकोस मला भाई.!

माझी सर्वात आवडती जवळची जुनी मैत्रीन माझी ताई,
मनातलं हर्ष दुःख सर्वच भाव ऒळखत असते ताई.!

मी लहान असताना आई रागात मला मारायची,
ताई हळुस माझ्या जवळ येऊन मला तिच्या कंबरेवर घ्यायची.!

मला दिष्ट लागु नये म्हणुन गालावर रोज काळज लावायची,
रोज रोज मी शाळेत जाते वेळी गंद पावडर करायची.!

छान छान रोज नवीन काहीतरी खाऊ करून द्यायची,
माझ्या सर्व गोष्टी तिच्या मनात ती जपून ठेवायची.!

सतत सर्वावर आनंद उधळत माझी ताई राहायची,
छोट्या मोठ्यांचा माझी ताई सदैव आदर करायची.!

ताई माझी फक्त प्रेमाचे फुलच ती वाहायची,
तू खुपच आहेस भाई छान मला सारख बोलायची.!

********************************
बालाजी लखने (गुरू)
उदगीर जिल्हा लातुर
8888527304
*********************************
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]