रक्षाबंधन

Started by Minakshi Pawar, August 18, 2016, 11:16:21 AM

Previous topic - Next topic

Minakshi Pawar

                     रक्षाबंधन

प्रेमाचे बंधन गोड कीती आहे
झरा हा प्रेमाचा मनातुन वाहे
माया गंगेपरी निर्मळ बहीण भावाची
वाट पाही बहीण रक्षाबंधनाची
रक्षाबंधनाला आली भावाच्या घरी
हा दीन नाही चुकले मी आजवरी
भाऊ माझा लाडका आहे गुणाचा
आनंद होतो त्याला रक्षाबंधनाचा
राखी बांधली हातावर रित जगाची
शपथ घेतली भाविने तिच्या रक्षणाची
रक्षणकर्ता भाऊ माझा बंधनाला पाळणार
मायेचा हात बहीण पाठीवरून फिरविणार
आशा ह्या बंधनाला आहे कुठे जोड
बहीण भावाचे नाते आहेच मुळी गोड
राखी असली कशी त्यात प्रेम दडलेले
बहीण भावाचे असे बंधन जोडलेले
या बंधनाला नाही  देता येईल नाव
रक्षणकर्त्या भावाला मिळतो मायेचा वाव.

            सौ. मीनाक्षी मोहनराव पवार
                     ९५५२६५९०११