सोबत

Started by sindu.sonwane, August 19, 2016, 03:53:45 PM

Previous topic - Next topic

sindu.sonwane

 महेंदी ने सजलेल्या हाता कडे बघून
तिने मला विचारले "अजूनही महेंदीने नाव लिहीतेस त्याच?"
मी फक्त स्मित केल
ती पुन्हा म्हणाली, पुरे कर हा मूर्खपणा
तो अजून कुणाचा तरी झाला आहे
ती पुन्हा बोलली, तुम्ही अजूनही भेटता , अजूनही बोलता?
डबडबलेल्या डोळ्यांनी मी तिच्याकडे बघितल
गालावरचे अश्रू पुसत हसून तिला म्हटल ,
माहिती आहे ग तो अजून कुणाचा तरी झाला आहे
पण, मी तर फक्त त्याचीच आहे
त्याला होता आल दुसर्याच म्हणून काय झाल ,
माझ प्रेम हे फक्त तो दुसऱ्याच होण्यापुरतच मर्यादित नव्हत,
बोलण्या आणि भेटण्या पुरतच प्रेम नव्हत केल मी,
आजही सतत बोलत असते मी त्याच्याशी
बस आता माझ्या मनाचा आवाज हा त्याच्या पर्यंत पोहचत नाही
आजही माझ्या प्रत्येक  गोष्टीत
मी त्याला गृहीत धरूनच जगते .
त्याच्या शिवाय वेगळ आयुष्य कधीच नव्हत माझ
आयुष्यात खूप पुढे निघून गेला आहे तो ,
संसार जिम्मेदारी यात पूर्ण गुंतला आहे तो
जीवनाच्या या वेगळ्या वळणावरी सोबत त्याला अजून कुणाची तरी आहे.
माझ आयुष्य मात्र तिथेच स्थिरावल आहे
जिथे तो मला सोडून गेला
प्रेम तर आजही माझ कमी नाही झाल
आजही प्रेम आहे माझ, त्याच्या मनावर , त्याच्या हृदयावर ,
त्याच्या रागावर, त्याच्या बोलण्यावर,
सुखाने सजलेल्या क्षणांवर आणि
त्याच्या सोबत दुःखाणे वाटून घेतलेल्या दिवसांवर
नाहीच जमल ग मला अजून कुणाच तरी होऊन जाण
खूप मोठ असत त्या मुलींचं मन
ज्यांना आपल्या प्रेमाला विसरून दुसऱ्याच होता येत
माझ मन खूप छोट आहे
म्हणून मला फक्त त्याचच  होता आल,
रखरखत्या या जीवनात मला एकट जगता आल,
पण, आयुष्यात जेव्हा कधी तो मागे वळून बघेल
देवा शपथ तुला सांगते,
सैराभैरा झालेल्या त्याच्या मनाला,
आणि डबडबलेल्या त्याच्या डोळ्यातून गळणाऱ्या अश्रुना
फक्त माझी सोबत लागेल
घट्ट मिट्टी मारून आपल्या मनातील दुःखाना
आणि डोळ्यातील अश्रुना वाट मोकळी
करून द्याला त्याला मी हवी असेन
कारण, त्याच्या हृदयातील प्रत्येक जागा हि कुणानाकुनाची खास असेल
पण त्याच्या हृदयात माझ्यासाठी जागा नाही आहे
कारण त्यानी अख्ख हृदयच मला दिल आहे जपायला..................
महेंदीने सजलेल्या माझ्या हातावर हात ठेऊन ती गहिवरली
घट्ट मिट्टी मारून ती गहिवरल्या आवाजाने बोलून गेली
"वेडी आहेस तू ................."
                                                    सिंदू

Shrikant R. Deshmane

khup chan aahe, suprb,
emotional aahe bt bhari aahe.. :)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

sindu.sonwane

#2
धन्यवाद देशमाने सर

sneha31

Lay bhari khup ch chan ...

sindu.sonwane


vikrams13

खूप मस्त आहे कविता , सरळ हृदयाला भिडणारीं
Vnsarak

sindu.sonwane

धन्यवाद विक्रम सर

mohinineware


sindu.sonwane