१५ ऑगष्ट आहे .चला आज देश आठवू यात

Started by विक्रांत, August 19, 2016, 05:26:03 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

 चला आज देश आठवू यात
झेंडा फडकू यात
देश भक्तीची गीते गाऊ यात
नाही काही हरकत नाही
एक दिवस तर एक दिवस
एक होऊ यात !

नंतर बरीच कारणे आहेत
पुन्हा भांडायला
जात आहे धर्म आहे भाषा आहे प्रांत आहे
अन काहीच नसेल तर
कुठलीतरी अस्मिता काढताच येते
आपल्याला उकरून .
हा, आता उकरणारे वेगळे असतात
धूर्त असतात
जणू सुनियोजित कट करणारे असतात
पण माती तर आपणच उधळायला जातो
आणि मातीला सुद्धा आपणच जातो

आज जरा आराम मिळेल
ओढाताणीला भ्रष्टाचाराला अनीतीला
(अन तशीही आज सुटीच आहे )
आज तिरंगी वेष असतील
डिश असतील 
फलक असतील
मेकप सुद्धा तिरंगीच असतील
आज भरपूर सेल असतील
शुभेछांचे मेल असतील
मेसेज असतील
टीवीवर ठरलेले सिनेमे लागतील
तीच जुनी गाणी वाजतील
सत्तर वर्ष झाली
सत्तांतरावर सत्तांतर झाली
जयजयकार अन भाषणे झाली

पण कळू लागल्यापासून
मला काहीतरी हरवल्या वाटते
चुकल्या सारखे वाटते
मला वाटते
मी अजूनही शोधात आहे
या देशाच्या ...!!

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/