पाऊस आणि ती...

Started by Balaji lakhane, August 19, 2016, 06:12:38 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

.............. पाऊस आणि ती.............

पाऊस पडत होता छान,
मला आठवत होते गीत.!
तुझी मला सतवत,
होती पाऊसात प्रीत.!!

        पाऊसाच्या सरी माझे काहीच,
        एेकत नव्हत्या बेधूंद बरसत होत्या.!
        माझ्या तुझ्या पाऊसातल्या भेटीची,
        फारच आठवण करून देत होत्या.!!

सतत सतत समोर माझ्या,
पाऊसात भिजताना दिसत होतीस.!
ये रे आज आपण पुन्हा,
पाऊसात भिजूयात बोलत होतीस.!!

         असच घडत असत सारखच गं,
         पाऊसाच्या सरी आल्यावर.!
         फक्त तेव्हा तुच असतेस परी,
         कायम माझ्या डोळ्या समोर.!!

तुझं माझं आणि पाऊसाच,
नातं किती बनलयं छान.!
प्रत्येक पाऊसात असत गं,
तुझं माझं एकमेंकाना बिलगन.!!

*********************************
बालाजी लखने (गुरू)
उदगीर जिल्हा लातुर
8888527304

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]